Friday, March 12, 2010
Diwali 2008
दिवाली मधे सुट्टी कुठेतरी बाहेर जाऊन साजरी करायची असे मनोमन ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही उभयता गोवा येथे जायचे ठरवून बाहेर पडलो. सुट्टी मजेत घालवून आम्ही परतीचा मार्ग पकडला साधारण एक तास ड्राइविंग केल्यावर सावंत वाडी च्या अलीकडे इन्सुली घाटात काही विपरीत झाले आहे ह्याची जाणीव झाली. गुजराती कुटुंब घेउन जाणारी बस घाटातुन साधारण ४० फुट खाली कोसलली होती. त्या मधील मानसाना बराच मुका मार बसला होता काही विव्हलत बसून रडत होते तर काहिना काय करायचे हेच सुचत नव्हते. माझ्या अंगात कुठून बल् आले कोणास ठावुक पण मी गाडीतून उतरून त्याना मदत करायचे ठरवले. माझ्या पाठोपाठ माझी बायको आणि बहीन पण उतरले. आम्ही पुढचा मागचा काही विचार न करता कामाला लागलो. मी तिथे बांधलेला दोर हातात घेउन सुचना द्यायला सुरवात पण केली होती माझे मलाच काही कळत नव्हते. प्रथमोपचार पेटी घेउन आम्ही सर्व जख्मी लोकाना प्राथमिक उपचार करण्यात गुंतलो होतो. बरीच लोक आजू बाजूला फक्त बघ्याची भूमिका घेउन थांबले होते पण मदतीला फार कमी लोक होते. नेहमी प्रमाने पोलिस उशिरा पोचले पण त्यानी लगेच सर्व ट्राफिक बाजूला घेउन मार्ग सुरलित केला. मार बराच लागला आसल्याने व् अपघाताची तीव्रता अधिक आसल्याने जख्मी लोकाना हॉस्पिटल मध्ये हलवने क्रमप्राप्त होते त्यादिशेने सर्व प्रयत्न चालू होते. इतकी वर्षे मी डोंगरात फिरतो आहे त्या सर्व अनुभवाचा आज मला उपयोग होत होता. लहान मुलाना मुका मार बराच लागला आसल्याने तिकडे माझे लक्ष होते.एका गोष्टीचे मला खरच खुप नवल वाटले की माझी बायको आणि बहिन ह्या सर्व घटनेत आपला खारीचा का होइना पण वाटा उचलत होत्या. बरयाच वेळा आपण नुसते रस्त्या वरील आपघात बघतो आणि निघून जातो पण हीच वेळ आपल्यावर पण येऊ शकते ह्याच आपण विचार पण करत नाही.आज मला माझे पण खुप नवल वाटले की इतक्या लाम्ब जायचे आसून सुद्धा मी त्या मदत कार्यात सामिल झालो होतो. स्थानिक पातली वरील बरीच मंडळी जमुन तिथे मदतीला धावली होती आणि त्यांचा झपाटा पण आश्चर्यकारक होता. ह्या सर्व घटनेत मला मात्र आपल्या क्षण भंगुर आयुष्याचे कुतूहल वाटले आणि आजू बाजुच्या लोकांमधला देव पण दिसला जो आपण सर्व जण शोधत आसतो. मी देखिल बर्याच वेळेला नुसता आपघात बघून निघून गेलो होतो पण इथे मात्र मी त्या अपघातग्रस्त लोकाना उपयोगी पडलो ह्याचे समाधान वाटते. पुण्यात आल्यावर मी कोकण मधील पेपर मिलवुन बातमी वाचली पण त्या अपघातात एका मुलाचा मृत्यु झाला हे वाचून मन खिन्न झाले. पण आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या मदतीचा हात मनाला खुप समाधान देऊन गेला.
Subscribe to:
Posts (Atom)