काही गोष्टी नुसत्या ऐकून देखील खूप बरे वाटते. माझेही तसेच काहीसे झाले आहे.माणसाला आपण केलेल्या कृत्य बद्दल घृणा वाटणे आणि त्याने त्याचे प्रायश्चित्त घेणे हे देखील माणूस पणा बद्दल बरेच सांगून जाते आणि तो माणूस आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव होते. माणूसच माणसाला छळतो आणि मग केलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त करू पाहतो. हरकत नाही जे कोणी आसे वागून परत माणसात येतात त्यांना माफ करणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जर त्यांनाच लाज वाटते आहे हेही नसे थोडके.
जीवनात आपण कळत नकळत खूप गोष्टी करत असतो आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाची तमा बाळगत नसतो, पण हे करत असताना आजूबाजूचे लोक आपले निरीक्षण करत असतात हे आपण सोयीस्कर विसरतो आणि तिथेच घात होतो. केलेल्या कृत्याबद्दल वाटलेली लाज हीच खूप आहे आणि त्याच्या बद्दल घेतलेल्या प्रायचीत्ताने तर आपण माणूस आहोत हि ओळख नव्याने जगाला होते. आमेन
No comments:
Post a Comment