काही दिवसा पूर्वी आमच्या सोसायटी मध्ये पाण्याच्या पंपाचे काम चालू होते आणि मी नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणी मध्ये रमलो. आमचे काकांचे शेत वडकी नाल्याला होते आणि आम्ही शाळेत असताना रविवारी किवा सुट्टी च्या दिवशी त्यांच्या बरोबर कल्ला करायला जात असू. शेतावर आणि बांधावर फिरताना खरच खूप मज यायची. तसे आमचे काम काही नसायचे पण जीप मधून जायला मिळतेय आणि ते हि शेतावर मग काय आम्ही एका पायावर तयार असायचो. १३ एकरात पसरलेलं विस्तीर्ण शेत. गाडी लावायचो तिथे जाई बाईचे घर आणि विहीर होती तिचे पाणी हि तेवढेच गोड होते. तिथे गेल्यावर थकवा असा जाणवायचा नाहीच. मनसोक्त हुंदडणे हा आमचा क्रम असायचा. किसन बैल घेऊन आला कि त्यांच्या मागे काठी घेऊन जायचे. कुळवणी कशी करतात ह्याचे बिनतोड प्रात्यक्षिक आम्हाला दिसायचे,गोफण फिरवून पाखर उडवणे म्हणजे काय असते हे केल्याशिवाय कळणार नाही. हुरडा पार्टी, मटन पार्टी हाय ज्या काय झ्याक काट्यागिरी मध्ये मोडणाऱ्या पार्ट्या आहेत त्या आम्ही लहानपणीच झोडल्या. एकेदिवशी काकांबरोबर एका नवीन विहिरीचे काम बघायला जायची संधी मिळाली. शनवार पेठेतून कासम भाई कडून सुरुंगाची दारू आणून ति विहिरीत काम करत असलेल्या कामगारा पर्यंत आम्ही पोचवायचो. पहारीने केलेल्या खोल खड्यात ति दारू भरून वात पेटवली कि लांब लांब पळायचे आणि एकच आवाज होऊन सर्व दगडाच्या ठिकर्या हवेत भिरकावल्या जायच्या स्वताला वाचवत आम्ही जीव घेऊन पळायचो पण परत येउन बघितले कि मोठा खड्डा झालेला दिसायचा आणि मग परत पुढील काम सुरु व्हायचे.त्याकाळी किती माणसे उपलब्ध असायची आणि ३-४ महिन्या मध्ये विहीर बांधून तयार पण व्हायची आज सारखे यंत्रवत तेव्हा काहीच नव्हते.
हे सर्व विचार इतक्या झर्रकन माझ्या मनात येउन गेले आणि मी गुरुजींनी टाकीवर फोडायला घेतलेला नारळ बघून भानावर आलो आणि एक अतिशय बालिश आणि जुनाट प्रश्न मी प्लंबर ला विचारला " अहो, पण इथे टाकीला पाणी चढवायला मोटर कुठाय? त्याने चमकून माझ्याकडे बघितले आणि "काय येडय" म्हणून मला सांगितले कि " साहेब आजकाल मोटारी पण पाण्यात बुडवून ठेवणाऱ्या मिळतात त्यांना बाहेर ठेवायची गरज लागत नाही" मी चाटच झालो आणि खरोखरच माझ्या अज्ञानाची मला कीव आली आणि तंत्रज्ञान किती पुढारलेले आहे ह्याची प्रचीती... मनोमन मी हात जोडले आणि फक्त पुटपुटलो कालाय तस्मे नमः....

No comments:
Post a Comment