गेली चार वर्ष मी एका व्यवसायाचे माध्यमातून खूप लोकांच्या घरी जातोय आणि मला असं जाणवते की बरीचशी मंडळी ही अजूनही कॉन्फर्ट झोन मधून बाहेर यायचं विचार करत नाहीयेत माहित नाही याची कारण निर् निराळी असतील पण म्हणतात ना की काम करायची लोकांची इच्छा च जणू मरून चालली आहे की काय इतपत हे जाणवतंय. पैसे कमावणे कुटुंब चालवणे आपले जीवनमान सुधारणे आणि प्रगती करत राहणे हा माणसाचा स्थायिभाव आताशा लोप पावतोय की काय अशी अनामिक भीती वाटायला लागली आहे. कित्येक लोक मला असे भेटले आहेत की ज्यांचे संसार हे आई वडिलांच्या पेन्शन वर चालू आहेत अशा लोकांना का कळत नाही की त्यांच्या नन्तर आपल्याला हा आधार मिळणार नाहीये मग जो पर्यंत ही मंडळी आहेत तो पर्यंत आपण आपले अर्थार्जन् का तयार करू नये..पण कामच करायला नको.. कुठल्या जगात ही लोक जगत आहेत हेच कळत नाहीये. किंबहुना मी अशी ही कुटुंब पाहतोय की ज्यांचे आईवडील हयात नाहीत आणि त्यांचे पेन्शन थांबल्या मुळे आर्थिक कोंडीचा सामना त्या त्या कुटुंबाला करावा लागतोय. एक अतिशय विचित्र मानसिकता पाहायला मिळते आहे जी येणाऱ्या काळा करिता समाजाला घातक आहे. जो तो शॉर्टकट मारून कसे जगता येईल ह्याच विचाराचा दिसतो क्वचित प्रसंगी असा एखादा भेट तो ज्याला आयुष्यात काहीतरी कमवायचे आहे काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. मित्रहो, येणारा काळ हा अकराळ विक्राल असणार आहे. आपल्याला काही पुंजी ही जतन करून ठेवावी लागणार आहे. चंगळवाद हा आता सगळीकडेच बघायला मिळतोय पण ह्याचे दुष्परिणाम हे अतिशय घातक असणार हे निसंशय !!!
आज् आपण जिथे आहोत जसे आहोत त्यातून जर एखादा छोटा मोठा व्यवसाय जरी सुरु केला तरी येणाऱ्या काळात तो विस्तृत रूप घेऊ शकतो आणि आपल्या बरोबर आपल्या कुटुंबास देखील आनंदी ठेऊ शकतो. फक्त मानसिकता हवी आहे की थोडे बाहेर पडून ह्या जगातल्या लागणाऱ्या गोष्टीकडे डोळस पणे बघायची. छोटेसे व्यवसायरूपी रोपटे कधी कल्पवृक्ष होऊन आपल्यावर धनाची बरसात करेल हेच कळायचे नाही. जे लोक माझा हा परिच्छेद् वाचतील त्यांना विंनंती आहे समाजात बदल घडवायचा असेल तर सुरवात स्वतः पासून करावी लागेल आणि हिरीरीने पुढे येऊन आपल्याला आपल्या स्वतः मध्ये बदल घडवत समजात् बदल घडवायचा आहे. कामाला लागा.. जास्त विचार करू नका. सुरवात छोटी असेल पण तुमची होणारी प्रगती ही डोळे दिपवणारी असणार हे निश्चित...उठा कामाला लागा....
No comments:
Post a Comment