कालचा "सैराट" हा सिनेमा पाहण्याचा अनुभव जरा हटके होता. दिग्दर्शकीय प्रतिभा संपूर्ण चित्रपटभर भरून होती. कारण एक अतिशय निर्भीड अशी कथा तितकाच दमदार अभिनय आणि जमून आलेली भट्टी...
प्रेम ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक जण आपापल्या परीने शोधत असतो. ज्याला मिळते तो नशीबवानच म्हणायचा अर्थात त्याचे निरनिराळे पदर ही आहेतच फक्त ते समोरच्याला ओळखता यायला हवे. प्रेम कोणावरही कुठेही कधीही होऊ शकते त्याला ना जातीपातीचे नियम ना कोणाची मर्यादा.
दोन जीवांनी ठरवलेल्या ह्या गोष्टीचा शेवट कधी गोड तर कधी कडू ही होतो.
जातीपातीच्या बंधनात प्रेमाला कोणी अडवायचा प्रयत्न केलाच तर ते सैराट झालेच म्हणून समजा. दोन जीवांनी एकत्र येणे हा गुन्हा कसा होऊ शकतो ह्याचे ऊत्तर काही केल्या मिळत नाही. समाज, पत, रीतभात, ह्या सर्व गोष्टी थोतांड वाटायला लागतात. मानवनिर्मित ह्या बेगडी सामाजिक साखळ्या इतक्या हीन पातळीवर जाऊन पोचतात की मनाला वेदना होतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजातून एखादी विकृती मग आक्राळविक्राळ स्वरूप धारण करते आणि त्या दोन जीवांचे आयुष्य पणाला लागते. अजूनही जाती बाहेर लग्न केलेल्या जोडप्यांना समाज बहीष्कृत करतो त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पंच मंडळी आगीत तेल ओतण्याचे काम पध्दतशीरपणे करतात. भारतात आज कित्येक बळी हे ह्या बुरसटलेल्या विचारांनी घेतले आहेत... नव्हे जातायत.
कित्येक समाजात अजूनही पंचायत राज अस्तित्वात आहे मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो की ह्या चांडाळाना एखाद्याचे आयुष्य बरबाद करायचा हक्क कोणी दिलाय. अस्तित्वात नसलेल्या ह्या सामाजिक मनाच्या भिंती कधीच तुटणार नाहीत का? की असेच घडत राहणार आणि बाकीचे लोक षंढा सारखे बघत राहणार... ह्या असल्या दळभद्री समाजात कोणीच मसीहा होणार नाही का? माणसातला देव कधीच ह्या समाज धुरीनांना दिसणार नाही का? इतकी वर्ष डोळ्यावर कातडी पांघरून असलेली ही विकृत मानसिकता कधीच लयाला जाणार नाही का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर कधी आणि कोण देणार...
एका अनुत्तरीत प्रश्नाची उकल देव जाणे हा समाज कधी देणार..
सैराट मधल्या आर्ची आणि परश्या सारखे अजून कीती बळी ही सामाजिक व्यवस्था घेणार कोणास ठाऊक..
एक बोलकी प्रतिक्रीया खास तुमच्यासाठी
सैराट...
खुप ऐकलेला आणि ह्या वर्षातला आत्तापर्यंतचा सर्वात गाजलेला मराठी चित्रपट आज पाहण्याचा योग आला, फायनली...!
एक खूपच सुंदर सिनेमा ज्यात समाजाच्या विचारधारणे पलीकडे जाऊन तरुण वर्गासाठी त्यातल्यात्यात बाल-तरुणांसाठी एक खूपच चांगली शिकवण आहे, मेसेज आहे कि
जात-पात, धर्म-पंथ ह्याच्या पलाकडे जाऊन प्रेम आहे पण प्रेम करायच्या, प्रेमाला अपने अंजामपर पोहोचवण्याआधी पोटा-पाण्याचा विचार करा. एफ.वाय. शिकून किंवा अर्धवट शिक्षण घेऊन घेतलेला असा कोणताही निर्णय तुम्हाला आयुष्यात डोसा बनवायला लावू शकतो....!
नंतर भलेही मेकॅनिक व्हाल, दोघं मिळून 40,000/- पगार कमवाल पण कांदा सोलू सोलू डोळ्यातून एवढं पाणी निघल कि जाळ-अन-धूर संगटच.....!
समाज आणि प्रेमवेडे ह्या दोघांनी खरतरं आत्मचिंतन करायला हवयं...
No comments:
Post a Comment