फोटोग्राफी एक अत्यंत क्रांतीकारी संकल्पना आहे ह्याचा प्रत्यय मला गेल्या एक वर्षापासून येत आहे. मी ठीकठाक फोटो काढू शकतो ह्याची मला आधी पासूनच माहीत होते पण हा छंद इतक्या झटकन मला पावेल याची सूतराम कल्पना नव्हती. कॅमेरा हातात घेऊन फोटो काढणे म्हणजे काही वर्षांपूर्वी लग्न आणि सभासमारंभ इथपर्यंत सिमीत असलेले हे क्षेत्र आज आभाळ कवेत घ्यायला निघालेय. जो तो कॅमेरा हातात घेऊन फोटोग्राफर होऊ पहातोय. तसे होणे ही काही वावगे नाही पण आपल्या छंदाचा कोणाला त्रास होत नाहीये ना हे बघण्याची तसदी घेतलीत तर ठीक.
अनेक नवनिर्मित फोटोग्राफर जंगलात जाऊन तिथल्या प्राण्यांचे फोटो काढताना आपण तिथे घालत असलेल्या धुडगूसाकडे चक्क कानाडोळा करतात. आपल्या घरात कोणी येऊन दंगा केलेला आवडेल का ? हाच नियम जंगलात राहणाऱ्या जीवांना पण लागू होतो हे ह्या धुरीनांना कोण सांगणार....
जंगलात जाऊन तिथल्या वनसंपदेचा नायनाट करण्याचा, तिथे राहणाऱ्या जीवाचा आपल्याला हवे तसे फोटो काढण्याच्या हट्टापायी आपण केवढा मोठा गुन्हा करतोय हे कीत्येक सुशिक्षित, प्रशिक्षित फोटोग्राफर च्या गावीही नसते. जंगल फोटोग्राफी चे सर्व नियम धाब्यावर बसवून हे सगळे उद्योग सर्रास चालू असतात. एका वर्तमान पत्रात ह्या विषयावर एक लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला म्हणून ह्या विषयावर मी माझे मत मांडले इतकेच. जाता जाता एक निर्वाणीचा ईशारा द्यावासा वाटतोय.... अजुनही वेळ गेलेली नाहीये, न जाणो सरकार ह्यावर पण एक कायदा करून वन्यजीव फोटोग्राफी ची वाटच बंद करून टाकेल...
मित्रानो, खबरदारी घ्या.. सावध ऐका पुढल्या हाका...
तुमच्या फोटोग्राफीच्या प्रवासाला शुभेच्छा !!!
Monday, May 9, 2016
जमलं तर बघा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
अजय लेख छान आहे. तु दिलेला ईशारा आपल्या सारख्या असंख्य फोटोग्राफरसाठी एक भितीच आहे. सरकार आपल्या परीने उत्तम प्रयत्न करतय पण त्यांचे पालन करणे हे सुजाण नागरीकांचे कर्तव्यच आहे. काही मूर्ख लोकांमुळे वाईल्डलाईफ फोटोग्राफीला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,वनसंपदेचे फायदे समजावणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करणे हे उपाय होऊ शकतात. आणि त्याद्रुष्टीने प्रयत्नही चालू आहेत. ह्यावर खुप सविस्तर चर्चा होऊ शकते पण माझे हे छेटे मत मांडून मी इथेच थांबतो.
ReplyDeleteआोंकार मुळगुंद.
धन्यवाद सर...
Deleteअजय लेख छान आहे. तु दिलेला ईशारा आपल्या सारख्या असंख्य फोटोग्राफरसाठी एक भितीच आहे. सरकार आपल्या परीने उत्तम प्रयत्न करतय पण त्यांचे पालन करणे हे सुजाण नागरीकांचे कर्तव्यच आहे. काही मूर्ख लोकांमुळे वाईल्डलाईफ फोटोग्राफीला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,वनसंपदेचे फायदे समजावणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करणे हे उपाय होऊ शकतात. आणि त्याद्रुष्टीने प्रयत्नही चालू आहेत. ह्यावर खुप सविस्तर चर्चा होऊ शकते पण माझे हे छेटे मत मांडून मी इथेच थांबतो.
ReplyDeleteआोंकार मुळगुंद.