Wednesday, June 8, 2016

वारसा रोटरीचा

आज ह्या  गोष्टीला  दिडेक वर्षे झाली. कांचनचा फोन आला होता. " काय  करताय,  संध्याकाळी  मातोश्रीवर  या...
आम्ही  ऊभयता तिथे  पोहोचलो  बघतो तर काय  आमच्या  आधीच  मंडळी  हजर  होती अर्थातच  सर्व  चेहरेही  नवीन  कोणाची  ओळखदेख नाही  पण  लोक  स्वतः येऊन  हस्तांदोलन  करून  ओळख  करून  घेत  होते . आमच्या  मनात  धाकधूक, नवीन  वातावरण  समोर  काय  घडतंय  ह्याचा  थांग  लागत  नव्हता. आपापल्या  क्षेत्रातील बडी मंडळी  आजूबाजूला  होती  आमच्या  क्लब चे नामकरण  व्हायचे  होते साधारण  दोन ते तीन  बैठकीनंतर  तो  दिवस  उजाडला. जून महिन्यात  आम्ही  सर्वजण  एका हाॅलमध्ये  जमलो  होतो  स्टेजवरून  नावाचा  पुकारा  होत  होता  तसतसे  एकेक  सभासद  आपले  चार्टर घ्यायला  जात  होते. आणि  क्लबचे  नामकरण झाले " रोटरी क्लब ऑफ पुणे  हेरिटेज " जगभर  पसरलेल्या  रोटरी  चा आम्ही  एक हीस्सा झालो  होतो.  क्लबच्या  ध्येयाची  ओळख  इथे झाली होती. हाच  वारसा  आता  आम्ही  पुढे नेणार  होतो.
इथून  पुढचा  प्रवास  हा  भरगच्च  कार्यक्रमाचा  राहीला. समाजोपयोगी  उपक्रम  घेऊन  तळागाळातील  लोकांपर्यत पोहोचवायचा  प्रयत्न  रोटरी  क्लबच्या माध्यमातून  केला जातो.  हेरिटेज  क्लबने  वर्ष  भरात  बरेचसे  सामाजिक  उपक्रम  राबविले. त्यातले  दोन तीन  उपक्रम  चांगले  गाजले. रक्तदान शिबिर तसेच  ग्रामीण  गरजू मुलांना  वह्या पुस्तके  खेळणी  कपडे  पोचवणे. गणपती  मूर्तीदान  कार्यक्रम, बिझीवल्ड॔ एकांकिका स्पर्धा..
मुर्ती दान  उपक्रम  विशेष  भावला  कारण  इतकी वर्षे  पारंपरिक पद्धतीने  गणपती  विसर्जन  करणारी  आपण  सर्व जण  पर्यावरणाच्या होणार्‍या  र्‍हासाला कारणीभूत  होतो  ह्याचे  भान  ह्या  उपक्रमाने  दिले. बर्‍याच  पुणेकरां पर्यंत  आमच्या  सभासदांनी हा  उपक्रम  पोचवला  त्यांच्या  मानसिकतेत  बदल  घडवला  आणि  त्याला  चांगलाच प्रतिसाद लाभला. एका  नवीन  संकल्पनेची मुहूर्तमेढ  आमच्या  क्लबच्या माध्यमातून  रोवली  गेली ह्याचा  विशेष  अभिमान वाटतो.
मागील  वर्षी  वेळे अभावी  उपस्थित  राहू  न शकलेल्या  आणि  दरवर्षी  प्रमाणे  ह्या  ही  वर्षी  विशेष  गाजली  ती  बिझीवल्ड॔ एकांकिका स्पर्धा  विशेषतः  माध्यमांनी दखल घेऊन  आमच्या  क्लबच्या  सदस्यांनी  केलेल्या  कामाला  पावती दिली. एक  वेगळा अनुभव  म्हणून  या  स्पर्धेकडे  पहावे  लागेल. संसारात  आणि  रोजच्या  रहाटगाडग्यात अडकलेल्या  माणसाला  आपल्या  आतील  कलाकाराचा आवाज  दाबून  मुकाटपणे  काम  करावे लागते.  अशाच हरहुन्नरी पण  निरनिराळ्या कंपनी तून काम  करणाऱ्या  कामगार  वर्गाला एकत्र आणणारी त्याच्यात  लपलेल्या  कलागुणांची भूक  भागवणारी स्पर्धा  म्हणजेच  रोटरी  क्लब  ऑफ पुणे  हेरिटेज  आयोजित  बिझीवल्ड॔  एकांकिका स्पर्धा... एकूणातच  ह्या  स्पर्धेचा आवाका  मोठा  होत  चाललाय  आणि  जास्तीत जास्त  लोकां पर्यंत  पोहचण्याचा  प्रयत्न  केल्या गेलेल्या  अतिशय  उत्तम  अशा उपक्रमास दाद  न मिळते  तर  नवलच !!!
मागच्याच महिन्यात क्लब  तर्फे  गरजू  व गरीब  महिला  करीता ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण  आयोजित करण्यात आले होते. ह्या  उपक्रमांतर्गत एखाद्या  स्त्री मध्ये  दडलेली  प्रतिमा  व क्षमता  त्या त्या  व्यक्तिला  दाखवून  देत सक्षम  बनवण्याचा  हा उपक्रम  खचितच  आवडला.
थोडक्यात  सामाजिक  वारसा  घेऊन  चाललेल्या  " रोटरी  क्लब" नामक  दिंडीत  सामील  होता  आले  आणि  समाजाकडून  इतके  वर्ष  घेत  आलो  आहोत  पण  आपण  समाजाचे  पण  काही  देणे  लागतो  ह्याची  शिकवण  नक्कीच मिळाली.  दर  शुक्रवारी  होणारी  रोटरीची सभा  ही  देखील  सर्व  सभासदांना  पर्वणीच असते. निरनिराळ्या क्षेत्रातील  दिग्गज  लोकांना  बोलावून  प्रत्येक  आठवड्याचा  शुक्रवार  हा  ज्ञानात भर  घालणारा ठरतो.

एक  कविता  सुचलेली....
रोटरी क्लब  पुणे  हेरिटेज  हा क्लब आमचा एक
समाजपयोगी  कामे  करतात  सभासद  सर्व  नेक
तळागाळातील  लोकांपर्यत पोचणे  हा  आमचा  श्वास
दारीद्र्याचे करू  उच्चाटन  हाच  सर्वाचा  ध्यास
जातीपातीच्या भिंतींना  इथे  नाही  थारा
रोटरी क्लब ऑफ पुणे  हेरिटेज  चा  समाजात  आहे दरारा
दीन  दुबळ्याची सेवा  करण्याचा उचलला  आहे  विडा
सामाजिक  नितीमत्तेचा हा  सर्वानाच  की  हो  धडा
बाकीच्यांना मंत्र आमचा  सढळ  हस्ते  बरस
कामे  करण्यात  आमचे  सभासद  एकाहून एक सरस

No comments:

Post a Comment