Thursday, February 9, 2017

चूटपूट...

प्रसंग एक-

मी  कामात  गर्क  आहे. दुकानात  अजूनही  बाकीचे  लोक  काम  करतायेत.  पसारा  हा  दिसतोय  पण  काम  पूर्ण झाल्यानंतरच त्याला  हात  लावता  येणार हा  विचार  येतो न येतो  तोच  मागून  एक  पोरगेलासा आवाज...
ओ भाव... ओ भाव..
मी  कामातून  डोके  बाहेर  काढत  त्याला  विचारले " काय  पायजे"
हा  एवडा फाम भरून  द्याल काय..
दहा  वर्षांचा  मुलगा  लाल भडक  रंगाचा  शर्ट  घालून  माझ्याकडे  बघत  होता. मागे  एक  ऐशी च्या  आसपास  पोहोचलेले आजोबा  जाड  भिंगाच्या चष्म्यातून  माझ्या  प्रतिसादाची वाट  पहात  होते. चष्म्याच्या  दोन्ही  काड्या  बांधून  ठेवायला  दोरा  गुंडाळला  होता. पायात  मळकट  धोतर, अंगात सदरा बहुतेक  बाहेर  गावचे  असावेत असा  अंदाज  मी  लावला. त्या  मुलाला  मी  विचारले " शाळेत  जातोस  ना मग  हा  फार्म  भरता  येत  नाही  का  तुला? तर  त्याने  नकारार्थी मान हलवली.  बाजूला  बॅक  असल्याने  हे  नवीन  नव्हते  मला.  मी  त्याला  आत  बोलावून  नाव  विचारले  तर  त्याने  सांगितले " "विजय  कानकात्रे"
कुठचा  रे तु?  माझा  पुढचा  प्रश्न !!
मी... बीडचा पण  आता  र्‍हायला पुन्यातच. शाळत सांगितलय  हीथ अकाउंट  काढायला, माझे  गणवेशाचे पैसे  जमा होणारेत डायरेक्ट...
बरं बरं... असं  म्हणत  मी  त्याचा  फाॅर्म  भरून  द्यायला  सुरवात  केली. कसा  भरतात  हे  देखील  त्याला  दाखवले. पाचच  मिनिटात  हे  सर्व  उरकले  तो  निघाला तसा  त्याने  मला  पुढचा फाॅर्म भरायला  पेन  मागितले पण  दुकानात  गडबड  असल्याने  मी  "बॅकेत बघ" असा  सल्ला  देत  पिटाळला.. यथावकाश  कामे  संपवून मी  बाहेर  पडलो  आणि  सहजच  विचार  डोकावला  की  अरे  मी त्याला  पेन  देऊनच  टाकायला  हवे होते. तेवढीच  त्याची एक  विवंचना  हलकी  झाली  असती.. पण  विचाराच्या  तंद्रीत  मी  एक  छोटे  सत्कर्म  करायचे विसरलो..

प्रसंग  दोन
मी  बुलेट वर  स्वार... रस्ता कापतोय.. अचानक  समोर  चारचाकी  वाहने  रस्त्यावर  काहीतरी  पडल्याने  वळसा  घालतायत. क्षणभर  मनात  विचारांचे  वादळ.. काय  बघायला  मिळेल  काही  शाश्वती  नाही. एवढा  होइतो मी  तिथपर्यंत  पोहोचतो ... आणि  बघतो तर  काय  रस्त्यावर  एक  झाडाची  डहाळी पडलीय  की  जी   नुकसान  करेल  इतपत  मोठी  आहे.. अरे..अरे..अरे.. हे  काय  मी  ही  त्याला  वळसा  घालून  माझा  रस्ता  धरलाय. ती  डहाळी मी  बाजूला  करताना  स्वतःला फक्त  विचारात   बघतोय ... मी पण  तसाच  पुढे  जातो... डहाळी तशीच...वाहतूक  तशीच  वळसेदार.. मी  मात्र  घाईत  निघालेला  एक  निष्क्रिय प्राणी...

वरील दोन्ही  प्रसंगात  काहीतरी  बदल  घडवता  आला  असता  पण  विचारचक्रात अडकून  काहीही  घडले  नाही. इथून पुढे  तरी  प्रसंगावधान घडो  हीच  मनोकामना....

आमेन

4 comments:

  1. अजय, प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात असे बरेच प्रसंग येतात, पण अशा प्रकारे जाणीव किती जणांना होते. तरीही अशा प्रसंगात आपल्याला प्रथम जे वाटते, ते कोणीही काहीही म्हणो, लगेच प्रत्यक्षात अमलात आणायचे. सगळ्यांना हेच वाटते पण सुरुवात कोणी करायची म्हणून पंचाईत होते. पण कोणीतरी सुरुवात केल्यावर साथ भेटते रे.
    रात्री झोपायला बिछान्यावर पाठ टेकल्यावर एक विशिष्ट प्रकारचे समाधान वाटते रे.
    (अर्थात हा माझा अनुभव आहे)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद
      बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपण दुर्लक्षित करतो पण त्यावर अंमल केला तर समाधान निश्चित...

      Delete
  2. Ase barechda hote, iccha tar khup asate karayachi pun mug dokyatale vichar ti gost karu det nahi, va tya goshti kade durlaksh karun aapan pudhe jato pun mug ek hurhur manala lagun rahate ti kayamachi.

    ReplyDelete
  3. धन्यवाद
    मला वाटले मीच ह्याचा शिकारी आहे. पण कळतंय की तुम्ही पण ह्या चुटपुटी चा अनुभव घेता आहात तर...

    ReplyDelete