भारतीय जनता आता लोकसंख्येचा स्फ़ोटा पाशी येऊन ठेपली आहे असे ऐकत होतो पण आता त्यावर विश्वास बसायला लागला आहे. माझा जन्म भारतातला आहे गेल्या पन्नास वर्षात बरीच स्थित्यतर मी अनुभवलि, बघितली आहेत पण आज मितीला मला जाणीव होतेय ती भारतीय जनतेच्या लोकसंख्येची. त्याला कारण ही तसेच आहे. आज तुम्ही जाल तिकडे लोक आहेत. इतकी आहेत की एकमेकांना धडकून पुढे जावे लागते की काय इतपत...मी गेल्या विस वर्षांपासून प्रवास करतोय त्यात मी सगळी साधन वापरून प्रवास केला आहे. पण मुख्य त्वे रेल्वे ने जास्त प्रवास मी केला जो की हर एक भारतीय रोजच अनुभवतो पण आज हा परी छेद लिहावासा वाटला कारण मी आज पुण्याहून रांची कडे जात आहे साधारण 30 तासाचा हा प्रवास सुपरफास्ट म्हणवल्या जाणाऱ्या गाडीतून करतोय पण जे काही आजूबाजूला पाहतोय ते बघून आता रेल्वे प्रवास किमान लांबचा टाळणे इष्ट होईल असे वाटायला लागले आहे. मित्रानो मी 3 ऐसी चे तिकीट बुक केले जेणेकरून प्रवास सुखकर होईल ही माफक अपेक्षा पण कसचं काय अन कसचं काय...काल निघाल्या पासून अडचण आणि आतर्किक घटनाची माळ च जणू चालू आहे..काल निघताना लोकांकडे बॅग्स होत्याच पण त्यात ही रंगाच प्लास्टिक बाद्ल्या आणि पिंप घेऊन लोक प्रवासाला निघालेली मी पहिल्यांदा बघत होतो की जे एखाद्या भांगरांत मिळेल ते घेऊंन प्रवास करायचे प्रयोजन काय हेच मला नाही समजले. सीट कन्फर्म झाले असे म्हणे पर्यंत माझ्याच नंबरवर अजून एक महाशय रेल्वे ने बसवले आहेत हे मला पहिल्यांदा कळले. एकच सीट दोघांना वाटून हे बघून तर मी चक्रवलोच.. आज पर्यंत असे कधी झालेले मी पाहिले नाही.प्रवास सुरु व्हायलाच गाडी 4 तास लेट निघाली म्हणजे ती आता पोहोचताना पण साहजिकच लेट होणार.. बर एसी बोगीचे बुकिंग आहे..तिकीट सामन्यापेक्षा महाग आहे तर गर्दी पण कमी असेल ही अपेक्षा फेल ठरली. इतकी गर्दी आणि नको तेवढे सामान घेऊन लोक चढली आहेत की काही सांगता सोय नाही. मागच्या वेळच्या प्रवासात मी गमतीने म्हणालो होतो आता स्लीपर क्लास नाही फक्त एसी किंवा विमान..पण आज तिच वेळ पुन्हा आलीये..आता एसी पण नको फक्त विमान...लांबच्या प्रवासाला विमानाने जाणे कधीही आपल्याला सोयीचे आहे. इतकी माणसांची गर्दी वाढली आहे की विचारता सोय नाही. अजून 10 वर्षानी काय होणार आहे काही सांगू शकत नाही...कदाचित विमानात पण स्टँडिग सुरु होईल असे वाटतेय.एक विदारक अनुभव घेत मी सुपरफास्ट म्हणवणाऱ्या ट्रेन मधून बैलगाडी च्या वेगाने जातो आहे. आणि गमन्ट म्हणजे तिकीट चेकर पण इतके निर्विकार फिरत आहेत की जसे आम्ही त्या गावचे नाहीच मुळी... अजब गजब कारभार आहे. थोडक्यात काय तर माणसांच्या भाऊ गर्दी मध्ये आपला आनंद हरवताना दिसतो आहे। तसेच आपण मनात ठरवतो एक आणि घडतेय भलतेच असा ही अनुभव येतो आहे. मी तरी लांबच्या प्रवासाला उंची ट्रेन किंवा महाग तिकीट असेल तर जाईन नाहीतर विमान आहेच... तुमचे काय?
No comments:
Post a Comment