Wednesday, June 2, 2010

जे जे फुकट ते ते पौष्टिक

खूप दिवसा पासून ज्याची वाट बघत होतो ते लिहिण्याचा आता मला वेळ मिळाला. माझ्या मागील बऱ्याच ब्लॉग मध्ये तुम्ही माणसांच्या नीरनिराळ्या स्वभाव वैशिठ्य बद्दल वाचले असेल. आज मला अजून एका वैशिष्टयाबद्दल सांगायचे आहे. खरतर वरील मथळा वाचून तुम्हाला कळले असेलच मी काय म्हणतोय ते. आपल्या जीवनात खूप काही घडते आणि ते सर्व चालू असताना जर का काही गोष्टी माणसाला विनासायास मिळाल्या कि तो उड्या मारायला लागतो. तसेच काहीसे कुठलीही गोष्ट किवा वस्तू माणसाला फुकट मिळाली कि त्याला कोण आनंद होतो आणि ती गोष्ट जर त्याला जास्त उपयुक्त असेल तर मग बोलूच नका त्याला स्वर्ग दोन बोटे उरला म्हणून समजा.हीच स्तिथी आपण सर्वांनी कधी न कधी अनुभवली असते आणि त्याचा उपभोग हि घेतलेला आसतो हो कि नाही? सांगायचा मुद्दा एवढाच कि मनुष्य स्वभाव हा असाच आहे त्याला तुम्ही कुठलीही गोष्ट उपकाराने द्या तो लगेच स्वीकारतो आणि धन्य होतो. माझ्या मते कुठलीही गोष्ट हि जर महत्प्रयासाने मिळाली कि त्याची किंमत हि आयुष्यभर टिकते किंबहुना त्या वस्तूचे मोल हे चिरकालीन राहते. मी जे काही लिहितो आहे हे तुम्हाला पटते आहे, पण विनासायास मिळालेल्या गोष्टीचा आनंद काही औरच असतो. कदाचित माणसाची हीच वृत्ती आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

No comments:

Post a Comment