Tuesday, April 22, 2014

सफरनामा कोकणाचा..



नवीन बाईक घेतल्याला आताशा वर्ष पूर्ण होईल पण कुठेतरी लांब जावे हि सुप्त इच्छा पूर्ण व्हायला आठ महिने थांबावे लागले आणि तो दिवस आला. आम्ही ७ लोक आणि ५ बाईक असे शनिवारी १२ एप्रिल १४ रोजी पुण्याहून रवाना झालो. सकाळ चा सुमार आणि थंडी हि खूप वाजत होती पण पावरफुल बाईक ने रस्ता कापण्यात जी मजा आहे ती सांगून काय कळणार महाराजा... त्याला तर गाडी घेऊन हाय वे  गाठावा लागतो असो.वेग म्हणावा तर ८० किमी प्रतितास असा ठेवून आम्ही कोकणच्या दिशेला कूच केले. ह्यावेळी पुनीत सिंग बांगा हाच आमचा लीडर होता फक्त रस्ता मीच त्याला सांगत होतो. वरंध घाट ओलांडून मंडळी कोकणात प्रवेश करती झाली आणि उन्हाची काहिली पण जाणवायला लागली. खेड पर्यंत मस्त गोवा हायवे होता आणि गाड्यांचे कान पिळणे एवढेच काम आम्ही करत होतो कारण रस्ता हा मलई होता.

वाऱ्याशी स्पर्धा करत आमचा प्रवास चालू होता आणि आम्ही खेड सोडून दाभोळ कडे रवाना झालो होतो.  पण पुनीत च्या गाडीने दगाफटका केलाच बाईक पंक्चर झाल्याने आम्हाला थांबणे भाग पडले. उन्ह आता मी म्हणत होती पण गाडीचे काम करणे हि तेवढेच महत्वाचे होते आणि आम्ही ते करून लगेच पुढच्या प्रवासाला निघालो देखील... आता  दाभोळ येथून आम्हाला बाईक फेरी बोट मध्ये टाकून पैलतीर गाठायचा होता. एक मस्त अनुभव घेत आम्ही धोपावे जेटी कडे निघालो


इथे एनरोन प्रकल्प वाकुल्या दाखवत थाटात उभा आहे जो सध्या रत्नागिरी ग्यास कंपनी कडे दिला आहे. कोकण चे क्यालिफोर्निया काही राज्यकर्ते करू शकले नाहीत ह्याचे दुख वाटून न घेत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवले.इथून पुढचा टप्पा हा गुहागर मार्गे तवसाल गाठणे हा होता. दुपार टळून गेली होती.आणि आंम्ही बाईक स्वार आमच्या इप्सित पर्यंत पोचायच्या प्रयत्नात होतो. कोकणात फिरताना एक मात्र मजेशीर असते तिथले रस्ते हे तुमचे स्वागत करायला कायमच  तयार असतात आणि त्यावरून प्रवास करताना एक आत्मिक आनंद हि अनुभवता येतो. इथून आम्ही गुहागर ह्या गावात प्रवेश करते झालो आणि आमच्या बुलेट गाड्या च्या दनदाणाटाने सगळा गाव  बाहेर येवून बघत होता.आम्हाला ह्याची मजा हि वाटत होती. इथून तवसाल साधारण २१ किमी आहे रस्ता वळणे घेत घेत त्या गावातून एका छोट्याश्या जेट्टीवर पोचतो.
पुनःच्ह सर्व गाड्या आता टाकून पलीकडे पोचायचे होते आणि आमचा आता हा शेवटचा टप्पा असणार होता.सरकारने केलेला अणुकरार आणि त्या संदर्भात तिथे होत असलेले बदल आपण डोळ्या देखत बघू शकतो. जयगड जवळच सरकारने अणु वर वीज निर्मिती केंद्र सुरु करायचे घाटले आहे त्या मुळे इथला परिसर आता झपाट्याने कात टाकतोय. डोंगरच्या डोंगर फोडून रस्ते बनवले जातायत आणि इथली भौगोलिक रचनाच बदलत आहे. जिंदाल पॉवर कडे ह्याचे काम आहे आणि ते देखील झपाट्याने पुढे सरकतेय...
  इथे पण  नवीन रस्ता बनत असल्या कारणाने एका कच्च्या सडकेवरून आम्ही धुराळा उडवत समुद्र किनारी येवून पोहचलो आणि आम्ही मालगुंडच्या सीमा रेषेवर आहोत ह्याचे आकलन झाले. परत गाड्यांचे कान पिळत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहचलो होतो.



खूप दिवसा पासूनची  इच्छा  आज पूर्ण झाली होती. जास्त क्षमतेच्या बायिक वरून फिरण्याचा आनंद काही और असतो तो अनुभवल्या शिवाय कळणार तरी कसा...

2 comments:

  1. तुझ्या लिखाणाचा आनंद घ्यायला नेहमीच आवडत. वर्णन उत्तम .. छायाचित्र नेत्रसुखद..भाषा ओघवती . पण लेख लगेच संपला वाचून संपला... कदाचित माझ्यासारख्या सामान्य वाचकाची तुझ्या सारख्या प्रतिभावंत लेखाकाकडून अजुन जास्ती लिहाव अशी अपेक्षा असावी

    ReplyDelete
  2. धन्यवाद अजित.. तू म्हणतो आहेस ते खरय. हा लेख इ तुकड्या तुकड्या मध्ये लिहिला असल्याने जर माझाच गोंधळ झाला आणि तो मी नीट पणे पूर्ण नाही करू शकलो. शेवटचा टप्पा हा गुंडाळला गेला आहे अजून लिहायचे होते पण नंतर राहून गेले. पण हा लेख एक टिपण म्हणून मी परत वापरू शकतो म्हणून खटाटोप. तू आपल्या रंग्पो सिक्कीम च्या ट्रीप चे देखील वर्णन माझ्या ब्लोग मध्ये वाचू शकतोस. वाच आणि प्रतिक्रिया कळव.

    ReplyDelete