Monday, August 15, 2016

15 ऑगस्ट... एक चिंतन

काल  मित्राने  फोन केला होता... अज्या, काय  करतोस  चल  जाऊ  फोटो  काढायला.. मस्त  धबधब्याचे  फोटो  काढूयात.!!!  त्याचे  वाक्य  पूर्ण  होते  ना  होते  मला  अंगावर  क्षणभर  घामच फुटला त्याला  कारणही तसेच  होते.  मागील  महिन्यात  सलग  आलेल्या  सुट्ट्या  आणि  आजूबाजूला  झालेली  वाहनकोंडी मला  डोळ्यासमोर उभी राहिली. मी  भानावर  येत  माझा  नकार  कळवला.. पण कुठेतरी  माझे  मन  मला  खात  राहीले... लागून  येणाऱ्या  सुट्ट्या चा  आताशा  उबग  यायला  लागलाय. कुठे  तरी  मस्त  डोंगरावर  भटकंती  करावी  तर  प्रत्येक  ठीकाणी  ही  माणसांची  गर्दी  दृष्टीस पडते.  सह्याद्री  मधले धबधबे  हा  तर  एखादा  प्रबंधाचा  विषय  ठरावा  इतका  गरम  मुद्दा आहे. आज  स्वातंत्र्य मिळुन   सत्तर वर्षे  झालीत  पण  मानसिकता  आपली  दळभद्री  लक्षणे  सोडण्याच्या उपरांत कमालीची  बिघडलीय.  पंधरा  ऑगस्ट  काय... सव्वीस जानेवारी  काय  इतरही  सुट्टीच्या हंगामात सहकुटुंब बाहेर  जाणे  म्हणजे  गुन्हाच  ठरावा इतपत परीस्थिती नजरेस  पडते. "सेलिब्रेशन"  च्या नावाखाली  ओंघळ व बीभत्स पणा दिसायला लागलाय.  या दिवसात पुण्याच्या आजूबाजूला कुठेही  जायचे असेल तर वाहतूक कोंडीशी दोन  हात करण्याची तयारी ठेवूनच घराबाहेर पडावे  लागतेय. नवश्रीमंताचा वाढता ओघ आलेली  सुबत्ता आणि  बदललेली अभिरुची  हीच  हया  मानसिकतेला कारणीभूत  ठरतेय.  गेल्या  दोन  दिवसापासून  वाहतूक  कोंडीची चित्र वर्तमान पत्रात  छापून  येताहेत. ऊद्या एखादा अपघात  देखील  आपल्याला वर्तमान पत्रात  झालेला कळेल. नको ही सुट्टी असे काहीसे वाटावे  इतपत घडणाऱ्या  घटनाचा उबग आलाय. सोशल  मिडिया  मुळे  कुठलीही  ठिकाणे लगेच  प्रसिद्ध  होतात आणि मग  सुरू  होतो  त्या  ठिकाणाचा र्‍हासाचा खेळ.. आजूबाजूच्या राहणाऱ्या  लोकांना  होणारा त्रास.. नैसर्गिक  ठेव्याचे एका ओंघळ कचरापेटीत होणारे रूपांतर... सगळेच कमालीचे विषण्ण करणारे... इतकी वर्षे डोंगरात फिरतोय पण मागील काही  वर्षांतच  हे असले फालतू  सेलिब्रेशन फंडे सुरू  झालेत. आपल्या देशापेक्षा महाकाय परिघ व लोकसंख्या जास्त असलेल्या देशात पण हे असे  घडत नसावे किंबहुना हा मानसिकतेमधला फरक असावा.
थोडक्यात काय  तर पुढील काही वर्षांत कोणी  सहकुटुंब बाहेर फिरायला पडत असेल तर त्यांना  सही सलामत पर्यटन घडो  ह्या शुभेच्छा दिल्यास त्यात नवल वाटायला नको...

No comments:

Post a Comment